कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज व बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा 2012 आपण जर शाळेत सभोवताली पाहिले तर काय दिसते? वर्गात कित्येकजण केरकचरा टाकतात;काही मुले तर गोंधळ करतात;काही जण छोट्या छोट्या कारणावरून मारामाऱ्या करतात, लहान मुलेच असे वागतात असे नव्हे ;तर मोठी माणसेही असे वागताना दिसतात. रस्त्यात कोठेही थुंकणे, घाण टाकणे हे प्रकार तुम्हाला सर्रास दिसतात.गाडीवाले इतरांना अडथळा होईल याची पर्वा न करता कुठेही गाड्या उभ्या करतात, काहीजण भरधाव गाड्या चालवतात; त्यामुळे अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागतात .येथे असे दिसेल की प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करतो .आपल्यामुळे इतरांना काही त्रास होतो का? इतरांचे काही नुकसान होते का? असा विचारच कोणी करत नाही असे का घडते? लोक वाईट आहेत म्हणून असे घडते का? याचे कारण असे की, चांगले काय आणि वाईट काय, याचे स्पष्ट चित्र लोकांच्या मनात नसते .आणि स्पष्टपणे कळत असले तरी, ते अंगवळणी पडत नाही म्हणून आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे आणि आपल्याबरोबर सर्वांना सुख समाधान मिळावे यासाठी आपण स्वतःला जे वळण ला...